इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विविध क्षेत्रात अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकचे व्हिजन मांडणारी नवी लेखमाला ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांच्या भेटीला येत आहे. “व्हिजन नाशिक” ह्या साप्ताहिक लेखमालेतून नाशिककरांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या “शक्ती-भक्ती-मुक्ती कॉरिडॉर, वेलनेस आणि योग विद्यापीठ, मुंबईचे किचन, वाइन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, महाराष्ट्राचे गुरुकुल – भारताची कौशल्य राजधानी, महाराष्ट्राचे ड्रायपोर्ट आणि एअर कार्गो हब” आदी विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
लेखक आहेत ज्येष्ठ उद्योजक पियूष सोमाणी
श्री. पीयूष सोमाणी हे नाशिकमधील ज्येष्ठ आयटी उद्योजक आहेत. “इ.एस.डी.एस. सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड” ही त्यांची कंपनी आहे, ही कंपनी भारतातील प्रथितयश डेटा सेंटर ग्रुप आणि क्लाऊड सर्विस प्रोव्हाडर आहे. या कंपनीचे ते संस्थापक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच “क्लाऊड कॉम्पुटिंग इनोव्हेशन कौन्सिल ऑफ इंडिया” ह्या अग्रगण्य संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय नाशिक शहराच्या विकासाचे स्वप्न आणि ध्यास असलेल्या “मी नाशिककर” या मंचाचेही ते संस्थापक आहेत. त्यांनी २००५ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी कंपनीची स्थापना करून आज APAC, युरोप, मध्य पूर्व, अमेरिका आणि आफ्रिका मधील १९ राष्ट्रांमध्ये यशस्वीपणे विस्तार केला आहे. पीयुष सोमाणी हे केवळ एक उद्योजक नाही तर एक लेखक आणि उत्तम कथाकार देखील आहेत. त्यांनी त्यांच्या “एंटरप्रेन्योर विथ द फायर विदिन” आणि “लिव्हिंग इन हार्मनी विथ द सन” या पुस्तकांमधून एक व्यक्ती आणि उद्योजक म्हणून त्यांच्या यशाचे रहस्य, प्रेरणादायी, जीवन अनुभव आणि ज्ञान शेयर केले आहेत.
लेखकाशी संपर्क
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp No. : 9011009700
India Darpan New Article Series Vision Nashik By Piyush Somani
Development