नाशिक – अतिशय वेगवान, दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्त देणाऱ्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘ वेब न्यूज पोर्टलने अवघ्या वर्षभरातच तब्बल ६४ लाख २५ हजाराहून अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या अत्यंत मोजक्या न्यूज पोर्टलमध्ये ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘चा समावेश झाला आहे. याचनिमित्ताने ‘इंडिया दर्पण‘ या साप्ताहिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले.
कोरोनाच्या काळात १ ऑगस्ट २०२० रोजी गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस‘ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ करण्यात आला. याच माध्यमातून वेब न्यूज पोर्टल, साप्ताहिक, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम व ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप या माध्यमातून वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण‘ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘ने वर्षभरातच ६४ लाखाहून अधिक दर्शकांची संख्या ओलांडली आहे.
अत्यंत आव्हानात्मक असलेल्या कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये इंडिया दर्पणने मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्वांची दखल देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘डेली हंट’ या न्यूज अॅपने घेतली. आज या अॅपवरही इंडिया दर्पणचे ६२०० हून अधिक फॉलोअर्स आहेत. या अॅपवर आतापर्यंत ४ हजाराहून अधिक बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. जगभर मराठी वाचक क्षणाक्षणाला या अॅपमुळे बातम्या वाचत आहेत. ‘इंडिया दर्पण‘चे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी, जाहिरात व्यवस्थापक राहूल भदाणे यांनी वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
पालकमंत्री भुजबळांनी अशा दिल्या होत्या शुभेच्छा
अवघ्या पाचच महिन्यात ११ लाख वाचकसंख्या ओलांडल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘इंडिया दर्पण‘च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. माध्यम क्षेत्रावरही कोरोनाने मोठा आघात केला, अशा काळात ‘इंडिया दर्पण‘ने मुहूर्तमेढ रोवून जे दैदीप्यमान यश मिळविले आहे, ते वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्र्यांनी काढले. ‘इंडिया दर्पण‘च्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. इंडिया दर्पण‘ हे अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. अतिशय वेगवान बातम्या देण्याची हातोटी आणि वैविध्यपूर्ण मजकूर यामुळे अतिशय कमी वेळेत लोकप्रिय झाले आहे. इंडिया दर्पण लवकरच कोट्यवधी लोकापर्यंत पोहचो आणि त्याची आनंद वार्ता मला मिळो, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले होते.
वर्षभरातील इंडिया दर्पण न्यूज पोर्टलची घोडदौड (आकडेवारी ३१ जुलै २०२१ पर्यंत)
व्हॉटसअॅप – १०० हून अधिक ग्रुप. त्यात २५ हजाराहून अधिक सदस्य
वेबसाईटचे दर्शक (व्ह्यूज) – ६४ लाख २५ हजार
फेसबुक पेज – ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स
डेली हंट – ६ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स
यूट्यूब चॅनल – १६०० हून अधिक सबक्रायबर्स आणि तब्बल ५ लाख ६३ हजाराहून अधिक व्ह्यूज
टेलिग्राम चॅनेल – १२०० हून अधिक सदस्य
ट्विटर – बातम्यांचे सातत्याने अपडेटस
दिवसाकाठी – प्रत्येक बातमी तब्बल ५० हजाराहून अधिक वाचकांपर्यंत पोहचते