नाशिक – अतिशय वेगवान, दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्त देणाऱ्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ वेब न्यूजच्या बातम्यांना ‘डेली हंट’ या न्यूज अॅपवर अवघ्या सात महिन्यात १ कोटी २५ लाख दर्शकांनी पसंती दिली. तर अवघ्या ४७९ दिवसात इंडिया दर्पणच्या पोर्टलवर तब्बल ९५ लाखाहून अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला. त्यामुळे पोर्टल व अॅप मिळून २ कोटी २० दर्शक संख्या इंडिया दर्पणची झाली आहे. अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या अत्यंत मोजक्या न्यूज पोर्टलमध्ये ‘इंडिया दर्पण लाईव्ह’चा समावेश आता झाला आहे.
कोरोनाच्या काळात १ ऑगस्ट २०२० रोजी गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस’ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ करण्यात आला. याच माध्यमातून वेब न्यूज पोर्टल, साप्ताहिक, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप या माध्यमातून वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण’ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ने ४७९ दिवसात ९५ लाखाहून अधिक दर्शकांची संख्या ओलांडली तर डेली हंटवर १ कोटी २५ दर्शकांनी पसंती दिली.
अत्यंत आव्हानात्मक असलेल्या कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये इंडिया दर्पणने मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्वांची दखल देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘डेली हंट’ या न्यूज अॅपने सात महिन्यापूर्वी घेतली. आज या अॅपवरही इंडिया दर्पणचे १२ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अॅपवर होणारी दर्शकांची संख्या वेगळी कांऊट केली जात असून येथे इंडिया दर्पणला १ कोटी २५ लाख व्हूज मिळाले आहे. जगभर मराठी वाचक क्षणाक्षणाला या अॅपमुळे बातम्या वाचत आहेत. ‘इंडिया दर्पण’चे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी, जाहिरात व्यवस्थापक राहूल भदाणे यांनी वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
इंडिया दर्पण न्यूज पोर्टलची घोडदौड
(आकडेवारी २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत)
व्हॉटसअॅप – १०० हून अधिक ग्रुप. त्यात २५ हजाराहून अधिक सदस्य
वेबसाईटचे दर्शक (व्ह्यूज) – ९५ लाख ११ हजार १७०
डेली हंटचे – १ कोटी २५ लाख व्हूज
डेली हंट – १२ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स
फेसबुक पेज – १४ हजार १८७ फॉलोअर्स
यूट्यूब चॅनल – १६४० हून अधिक सबक्रायबर्स आणि तब्बल ५ लाख ७४ हजाराहून अधिक व्ह्यूज
टेलिग्राम चॅनेल – १ हजार ८६ सदस्य
ट्विटर – बातम्यांचे सातत्याने अपडेटस
दिवसाकाठी – प्रत्येक बातमी तब्बल ५० हजाराहून अधिक वाचकांपर्यंत पोहचते