नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिशय वेगवान, दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्त देणाऱ्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ वेब न्यूज पोर्टलने अवघ्या ३४ महिन्यात तब्बल ११ कोटी ११ लाखाहून अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. या महाविक्रमी पोस्टरचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबईतक वृत्तवाहिनीचे प्रमुख साहिल जोशी हे उपस्थितीत होते. इंडिया दर्पणची ही अतिशय कौतुकस्पद कामगिरी पाहून सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सध्याच्या माहिती विस्फोटाच्या काळामध्ये दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्तसेवा देणाऱ्या संस्थांची नितांत गरज आहे. इंडिया दर्पण हे काम मोठ्या जबाबदारीने सांभाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंडिया दर्पणचे कौतुक करत अन्य मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या काळात १ ऑगस्ट २०२० रोजी गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस’ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ करण्यात आला. याच माध्यमातून वेब न्यूज पोर्टल, साप्ताहिक, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप या माध्यमातून वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण’ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ने ३४ महिन्यात तब्बल ११ कोटी ११ लाखाहून अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) संख्या ओलांडली आहे.
अत्यंत आव्हानात्मक असलेल्या कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये इंडिया दर्पणने मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्वांची दखल देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘डेली हंट’ या न्यूज अॅपने घेतली. आज या अॅपवरही इंडिया दर्पणचे २९ हजाराहू अधिक फॉलोअर्स आहेत.
जगभर मराठी वाचक क्षणाक्षणाला या अॅपमुळे बातम्या वाचत आहेत. ‘इंडिया दर्पण’चे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी यांनी वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
पाचच महिन्यात ११ लाख वाचकसंख्या
अवघ्या पाचच महिन्यात ११ लाख वाचकसंख्या ओलांडल्यानंतर ‘इंडिया दर्पण’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. माध्यम क्षेत्रावरही कोरोनाने मोठा आघात केला, अशा काळात ‘इंडिया दर्पण’ने मुहूर्तमेढ रोवून जे दैदीप्यमान यश मिळविले आहे, ते वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले होते. ‘इंडिया दर्पण’च्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. इंडिया दर्पण हे अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. अतिशय वेगवान बातम्या देण्याची हातोटी आणि वैविध्यपूर्ण मजकूर यामुळे अतिशय कमी वेळेत लोकप्रिय झाल्याच्या शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या होत्या.
इंडिया दर्पण न्यूज पोर्टलची घोडदौड
(आकडेवारी २७ मे २०२३ पर्यंत)
व्हॉटसअॅप – १५० हून अधिक ग्रुप. त्यात ५० हजाराहून अधिक सदस्य
वेबसाईटचे दर्शक (व्ह्यूज) – ११ कोटी लाख ११ लाखाहून अधिक
फेसबुक पेज – २५ हजार ७७७ फॉलोअर्स
डेली हंट – २९ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स
यूट्यूब चॅनल – ८ लाख २८ हजाराहून अधिक व्ह्यूज
ट्विटर – बातम्यांचे सातत्याने अपडेटस
दिवसाकाठी – प्रत्येक बातमी तब्बल १ लाखाहून अधिक वाचकांपर्यंत पोहचते