मनमाड – इंडिया दर्पण प्रकाशनाच्या दी इंग्लिश मॅन्युअल या दुस-या पुस्तकाचे प्रकाशन गोदावरी अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्या आर्कि. अमृता पवार, सामाजिक कार्यकर्त्या अजिता गाणू यांच्या हस्ते कवी रविंद्रनाथ टागोर स्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला. कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कुलचे प्राचार्य व चेअरमन मुकेश मिसर यांनी हे पुस्तक लिहले आहे. या प्रकाशन सोहळ्यात आर्की. अमृता पवार यांनी या पुस्तकाचा कौतुक केले. त्या म्हणाल्या की, पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील मजकूर इंग्रजी शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे त्यातून इंग्रजी विषयाची मनातील भीती कमी होण्यास निश्चित मदत होईल. इंग्रजी शिकवण्याचा मिसरसर यांचा प्रयत्न हा आगळा वेगळा व अनोखा असून तितकाच गौरवास्पद असल्याचेही सांगितले. तर सामाजिक कार्यकर्त्या अजिता गाणू यांनी दी इंग्लिश मॅन्युअल या अनोख्या पुस्तकाच्या पुढील काळात अनेक आवृत्या निघून समाजातील तळागाळातल्या माणसापर्यंत हे पुस्तक पोहचेल. पालकांनीही घरामध्ये मुलांबरोबर या पुस्तकांतील रोज दोन पाने वाचल्यास घरांतील सर्वाचेच इंग्लिश छान व सोपे होईल, अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमात इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी साडेचार कोटीचा टप्पा गाठणारे इंडिया दर्पण वेब पोर्टलने प्रकाशन क्षेत्रात गेल्या वर्षात पाऊल टाकले असून हे दुसरे पुस्तक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी एकुणच पुस्तकाच्या निर्मितीची व वेब पोर्टलबद्दल माहिती दिली. तर सांस्कृतिक संपादक देवीदास चौधरी यांनी पुस्काचे कौतुक केले. यावेळी केटीएचएम महाविद्यालय नाशिकचे इंग्रजीचे प्राध्यापक अनिल टर्ले , मनमाड महाविद्यालयाच्या प्रा. कविता काखंडकी ख्यातनाम बालरोग तज्ञ डॉ. रवींद्र राजपूत, छत्रे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, देविदास चौधरी इत्यादीं मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सचिन बिडवे, सौ प्रतिभा पवार यांनी सादर केलेल्या इशस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक व्यवहारे यांनी मांडले. व सूत्रसंचालन सचिन बिडवे सौ संगीता कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन अमिता झाडे यांनी केले दी इंग्लिश मॅन्युअल या पुस्तकाच्या प्रकाशनामागील पार्श्वभूमी व त्याची आवश्यकता याबाबत लेखक, प्राचार्य मुकेश मिसर यांनी आपल्या मनोगतातून मांडले .व उपस्थित प्रमुख पाहूण्यांचे स्वागत केले. व्यासपिठावर इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, निवृत्त उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी, डॉ. प्रदीप साळी, वैभव कुलकर्णी दीपक व्यवहारे, धनंजय निंभोरकर, मनोज छाबडा किशोर माळी उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यास विविध शाळेतील मुख्याध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक, विदयार्थी, पालक व शहरातील शिक्षण क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थिती होते. उपस्थित विविध पालकांनी मान्यवरांनी मुकेश मिसर यांचा या कार्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. पुस्तक प्रकाशन समारंभ च्या शेवटी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी पुस्तकाच्या स्टॉलला भेट देऊन पुस्तक खरेदीस उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेश सोनवणे राम महाले भारती पवार मनोज जाधव स्वाती बिडवे अनिता शाखाद्वीपी वैशाली रसाळ व अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभले.
संदर्भ पुस्तक म्हणून संग्रही असावे.
मागील २० वर्षापासून इंग्रजीचे शिक्षक मुकेश मिसर यांचा इंग्रजी विषय शिकविण्याचा अनुभव व फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स च्या माध्यमातून विदयार्थ्यांना इंग्रजीत शास्त्रशुध्द पध्दतीने इंग्रजी भाषेचे दिले जाणारे ज्ञान दि इंग्लिश मॅन्युअल यात समाविष्ट केलेले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत संभाषणकौशल्य व परिपूर्ण इंग्रजी व्याकरण करीता अत्यंत आगळं वेगळ व उपयुक्त आहे. पुस्तकात अत्यंत साधी भाषा व अनेक उदाहरणे व आवश्यक त्या ठिकाणी चित्रांचा व मराठी भाषेचा केलेला समर्पक वापर इंग्रजी भाषेची भिती घालविण्यास मदत करते. या पुस्तकाचा वापर विदयार्थी, शिक्षक व घरात विदयार्थ्याचा इंग्रजी विषयाचा अभ्यास घेणारे पालक सहज करू शकतात इतके सुलभ व विदयार्थीकेंद्री तसेच नविन शैक्षणिक धोरणाला अनुसरून आहे. म्हणून हे पुस्तक प्रत्येकाकडे एक संदर्भ पुस्तक म्हणून संग्रही असावे.