नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली होणाऱ्या जी-२०च्या पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत या उल्लेखाने नवीन वाद निर्माण झाला आहे. अशात खरोखर येत्या काळात इंडियाचे भारत झाल्यास त्याचा परिणाम संकेतस्थळांवर होणार का, संकेतस्थळ बंद होईल का, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रेसिडेट ऑफ भारत असा उल्लेख असलेली जी-२०च्या डिनरची पत्रिका आणि लवकरच होऊ घातलेले संसदेचे विशेष अधिवेशन यामुळे मंगळवारी दिवसभर राजकारण तापलेले होते. अशात या विशेष अधिवेशनात सरकार संविधानात देशाचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते, असे मानले जात आहे. देशाचे नाव बदलून इंडिया ते भारत करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, देशाची ही दोन्ही नावे राज्यघटनेत आहेत.
दरम्यान, इंडिया हे नाव काढून टाकल्यास अनेक बदल घडू शकतात. यातील एका बदलाचा परिणाम देशातील सर्व वेबसाइटवर होऊ शकतो. त्या सर्व वेबसाइट्स, ज्या .in डोमेनवर कार्यरत आहेत, त्या बदलल्या जाऊ शकतात. मात्र, संकेतस्थळांचा हा बदलाची सध्या चर्चा सुरूआहे. कारण टीएलडी म्हणून काय ठेवते यावर ते पूर्णपणे देशावर अवलंबून असते. जर सर्व भारतीय वेबसाइट्सच्या शेवटी .in असं असेल तर त्या BHARAT नावानंतर थांबतील का? कारण सर्व देशांच्या वेबसाइट्सना भारताच्या IN प्रमाणे शेवटी एक कोड असतो. जर आता याचे BHARAT झाले तर शेवटी Bh लावावे लागणार आहे. तर जुन्या .in डोमेनचे नाव बंद होणार असल्याचे बोलले जात आहे.
टीएलडीवर होणार परिणाम
कोणत्याही देशाचे नाव बदलल्याने त्याच्या डोमेन म्हणजेच टीएलडीवर देखील परिणाम होऊ शकतो. या निर्णयाचा देशावर परिणाम होणार आहे. टीएलडी हे दोन अक्षरी डोमेन आहे, जे देशाच्या ओळखीशी जोडलेले आहे. जसे की us अमेरिकेत, uk युनायटेड किंगडममध्ये de जर्मनीमध्ये वापरले जाते. जेव्हा एखादा देश त्याचे नाव बदलतो तेव्हा टीएलडीवर देखील परिणाम होऊ शकतो.
असे होतील बदल
टीएलडी बदलल्यानंतर जुन्या टीएलडीला नवीनकडे रीडायरेक्ट केले जाईल त्यासाठी सध्याच्या वेबसाइट मालकांना वेळ लागणार असून ही प्रक्रिया हळुहळु होणार आहे. देशात असलेल्या डोमेन ओनरांना त्यांची डोमेन नावे अपडेट करावी लागतील. ओनरांनी डोमेन बदलल्यास, त्यांच्या वेबसाइटची URL, ईमेल पत्ता आणि इतर ओळख बदलतील. याशिवाय, टीएलडी बदलण्याच्या बाबतीत, एखाद्याला आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांशी वाटाघाटी करावी लागेल, यामुळे हे स्थलांतर सुरळीत करता येईल, एवढेच नाही तर डोमेन रजिस्टरासह आंतरराष्ट्रीय समुदायाला हा बदल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी लागेल.
India Bharat Name Change Row Website Domain Name