इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अनेक अर्थांनी खास ठरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्टेडियममध्ये पोहोचले असून त्यांनी हा सामना खास बनवला आहे. या सामन्यात खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या नेत्यांनी आपापल्या देशाच्या संघाच्या कर्णधारांना खास कॅप्स देऊन सन्मानित केले. यानंतर त्यांनी एकत्र मैदानावर एक फेरी मारली आणि नंतर राष्ट्रगीताच्या वेळी खेळाडूंसोबत उभे राहिले.
खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये, दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उबदार आणि मजबूत संबंधांचे उदाहरण दिले. या सामन्यात नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या 75 वर्षांच्या क्रिकेटच्या आठवणी दाखवण्यात आल्या होत्या.
https://twitter.com/BCCI/status/1633681241018093568?s=20
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचल्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर आपापल्या देशांच्या कर्णधारांना विशेष टोप्या देण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी खास वाहनातून स्टेडिअमचा फेरफटका मारला. नाणेफेकीनंतर रवी शास्त्री हे पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजसोबत स्टेडियमच्या गॅलरीत पोहोचले. भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक खास क्षण येथे जतन करण्यात आले आहेत. रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना त्यांच्याबद्दल सांगितले. यावेळी रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक सामन्यांची माहिती दिली.
https://twitter.com/BCCI/status/1633670614979612673?s=20
पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचले. यावेळी खेळाडूंना त्यांच्या पंतप्रधानांची साथ होती. दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि राष्ट्रगीतासाठी एकत्र उभे राहिले. BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना एक विशेष कलाकृती सादर केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करण्यात आले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1633678475650551808?s=20
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्टेडिअमच्या आवारात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. होर्डिंगवर पंचलाईन “क्रिकेटच्या माध्यमातून मैत्रीची 75 वर्षे” अशी होती. या होर्डिंग्जमध्ये दोन्ही देशांच्या भूतकाळातील आणि सध्याच्या क्रिकेटमधील दिग्गजांचा समावेश होता. होर्डिंग्ज केवळ कॉरिडॉर, सराव क्षेत्र आणि इतर पदपथांवरच लावले गेले नाहीत तर पारंपारिक साईटस्क्रीनच्या जवळही त्यांना एक प्रमुख स्थान देण्यात आले होते.
https://twitter.com/BCCI/status/1633683649743974400?s=20
India and Australia PM Cricket Match Stadium