बुधवार, मे 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी…

by India Darpan
मे 26, 2025 | 8:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
photo credit air

photo credit air


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने रविवारी कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.

खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने बहरीनच्या शूरा कौन्सिलचे अध्यक्ष अली बिन सालेह अल सालेह आणि बहरीनचे उपप्रधानमंत्री शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळानं दहशतवादी कारवायांविरुद्ध भारताची भूमिका मांडली. हे शिष्टमंडळ आता कुवेतला जाणार असून यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, आणि अल्जेरियाचा दौरा करणार आहेत.

खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज दक्षिण कोरियाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देत भारताची भूमिका मांडली.

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं, न्यूयॉर्कमध्ये ९/११ स्मारकाला भेट दिली. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाचे सदस्य असलेले भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि खासदार सरफराज अहमद गयाना इथं पोहोचले. यानंतर ते अमेरिका, पनामा, ब्राझील आणि कोलंबिया देशाला भेट देतील.

द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले आहेत.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत. या शिष्टमंडळानं दहशतवादा विरुद्धच्या लढ्यात भारताला साथ दिल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातचे आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विशेष लेख….अर्थव्यवस्थेची छलांग…भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था..

Next Post

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १० लाख रुपयांची लाच…सीबीआयने केली एनएमसीच्या वरिष्ठ डॉक्टरला अटक

Next Post
cbi

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १० लाख रुपयांची लाच...सीबीआयने केली एनएमसीच्या वरिष्ठ डॉक्टरला अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कामामध्ये आळसपणा करू नये, जाणून घ्या, बुधवार, २८ मेचे राशिभविष्य

मे 27, 2025
image0033TU5

या वर्षापर्यंत ७६ जलमार्ग कार्यान्वित करण्याचे लक्ष्य; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

मे 27, 2025
Untitled 54

मयुरी जगताप हगवणे कौटुंबिक छळ प्रकरण….राज्य महिला आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

मे 27, 2025
mahavitarn

सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी बाबत महावितरणने दिली ही माहिती….

मे 27, 2025
IMG 20250527 WA0325 1

नाशिक जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानांतर्गत विभागीय प्रथम पुरस्कार…ही पंचायत समिती विभागात तिसरी

मे 27, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण दहा निर्णय

मे 27, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011