जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारणी मंडळाने नाशिक येथील सभेत सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपाच्या निर्णय घेतला आहे. संपाची नोटीस २४ फेब्रुवारी रोजी शासनास देण्यात येईल बेमुदत संप १०० टक्के यशस्वी करण्याच्या निर्धार कार्यकारणी मंडळाने व्यक्त केला असून शिक्षक भारतीने या बेमुदत संपात सहभागी होण्याच्या निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
शिक्षक भारती संघटना समन्वय समितीच्या घटक असून जुन्या पेन्शनसाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले आहे. राज्य अध्यक्ष अशोक दगडे प्रदेश सरचिटणीस विश्वास काटकर मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सरचिटणीस आणि सदस्य या सोबत राज्यभर समन्वय समिती बरोबर शिक्षक भारतीचे पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सरचिटणीस आणि सदस्य या सोबत राज्यभर समन्वय समिती बरोबर शिक्षक भारतीचे पदाधिकारी बैठका घेऊन संप १०० टक्के यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष नारायण वाघ कार्याध्यक्ष आर. जे. पाटील चंद्रकांत देशमुख, कार्यवाह अमोल वाणी, खजिनदार श्रीमती सुनिता पाटील, श्रीमती सुरेखा वैष्णव, महिला आघाडी विजय सोनवणे, युवराज पाटील, शांताराम महाजन, गोकुळ राजपूत, विजयकांत पाटील, संजय वानखेडे, हेमंत सावकारे, संजय पाटील, ईश्वर राजपूत, विलास पाटील, जी. बी. पाटील, राऊत, अजित खाटीक, अभिजीत खलाणे, निलेश पाटील, निकम सर, शेखर पाटील, पंकज पवार, सत्यवान चौधरी, संजय साळुंखे, यांनी दिली आहे.