सेंच्युरिअन (दक्षिण अफ्रिका) – भारताने दक्षिण अफ्रिकेला तब्बल ११३ धावांनी पराभूत करीत पहिली कसोटी जिंकली आहे. त्यामुळे भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे फलंदाज के एल राहुलने पहिल्या डावात केलेले शानदार शतक आणि या सामन्यात मोहम्मद शमीने घेतलेले ८ बळी.
भारताने सर्वप्रथम फलंदाजी करीत ३२७ धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात अफ्रिकेने पहिल्या डावात १९७ धावाच केल्या. भारताने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांची गरज होती. अफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. अफ्रिकेचा संघ १९१ धावात गारद झाला. त्यामुळे भारताने १३१ धावांनी विजय मिळविला.
https://twitter.com/BCCI/status/1476506120067813376?s=20
ऐतिहासिक विजय का
भारतीय संघाने अफ्रिकेतील सेन्चुरिअन मैदानावर हा विजय मिळविला आहे. यातील खास बाब म्हणजे आशिया खंडातील कुठल्याही संघाला या मैदानावर अफ्रिकेचा पराभव करीत विजय प्राप्त करता आलेला नाही. अफ्रिकेचा संघ या मैदानावर सर्वाधिक वेळा विजयी झालेला आहे. त्यामुळे भारताने अफ्रिकेला नमवत इतिहास घडविला आहे.