पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी, पारलिंगी व तृतीयपंथी नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पारलिंगी तथा तृतीयपंथी व्यक्तींची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक तृतीयपंथीय नागरिकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रॅण्ड ॲम्बेसिडरच्या नियुक्तीसाठी इच्छुक पारलिंगी, तृतीयपंथी व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, अभिनयाचे व्हिडीओ आणि आवश्यक कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे ६ येथील कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.