इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य होते, परंतु संघाने निर्धारित षटकांत 8 गडी गमावून 306 धावा केल्या. कर्णधार शनाकाने श्रीलंकेसाठी शतक झळकावले, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज उमरान मलिक ठरला, त्याने 3 खेळाडूंना बाद केले.
तत्पूर्वी, भारताने विराट कोहलीच्या 113, रोहित शर्माच्या 83 आणि शुभमन गिलच्या 70 धावांच्या खेळीच्या जोरावर 7 गडी गमावून 373 धावा केल्या होत्या. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ जानेवारी रोजी कोलकात्याच्या ईद गार्डन स्टेडियमवर होणार आहे.
भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 306 धावाच करू शकला. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 108 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी विराट कोहलीने पहिल्या डावात शतक झळकावले.
https://twitter.com/BCCI/status/1612841479810199552?s=20&t=KoHVOyFnP8j7snQnu2HJmg
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. गिल ७० आणि रोहित ८३ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने 113 धावा केल्या. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार योगदानामुळे भारताने 373 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर श्रीलंकेला पुनरागमन करणे कठीण झाले.
निशांक एका टोकाला उभा होता, पण दुसऱ्या टोकाला त्याला कोणाचाच आधार दिसत नव्हता. निशांक 72 धावा करून बाद झाला. दरम्यान, धनंजय डिसिल्वाने 47 धावा केल्या, पण त्या पुरेशा ठरल्या नाहीत. शेवटी, दासुन शनाकाने 108 धावांची खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शनाका एका टोकाला 108 धावांवर नाबाद राहिला, पण श्रीलंकेचा सामना 67 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी (गुरुवार) रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1612845510829932547?s=20&t=KoHVOyFnP8j7snQnu2HJmg
Ind vs Sl 1st ODI India Win by 67 Runs
Sri Lanka Cricket Sports