इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऐन दिवाळीच्या सणात संपूर्ण भारतवासियांचे ज्याकडे लक्ष लागले आहे त्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. टी२० विश्वचषकात आज दोन्ही प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने युझवेंद्र चहलच्या जागी अश्विनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, तर हर्षल पटेलला वेगवान गोलंदाजांमध्ये स्थान मिळालेले नाही. भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. फिरकी विभागात अश्विनला अक्षर पटेलची साथ मिळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले, तेव्हा बाबर आझमच्या संघाने भारताचा १० विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिला विजय ठरला.
भारतीय संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
पाकिस्तान संघ असा
बाबर आझम (सी), मोहम्मद रिझवान (प.), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.
IND vs PAK T20 World Cup 2022 Match Start