इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – १९ वर्षे वयाखालील महिलांचा टी२० विश्वचषक सध्या सुरू आहे. यामध्ये भारतीय संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे टीम इंडिया आता अंतिम फेरीत पोहचली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी होईल. उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंड संघाचा ८ गडी राखून पराभव केला आहे.
महिला अंडर-१९ T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने दोन गडी गमावून हे साध्य केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने दोन गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी उपकर्णधार श्वेता सेहरावतने नाबाद 61 धावा केल्या.
https://twitter.com/BCCIWomen/status/1618924956162887681?s=20&t=zAkPcJHtiPYI0TMRlpW3Tw
IND vs NZ U-19 T20 Women World Cup Final