इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यात अनेकदा व्यत्यय आला, पण शेवटच्या वेळी पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 12.5 षटकात 1 गडी गमावून 89 धावा होती. पावसाचा जोर इतका होता की सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेर सामना रद्द करण्यात आला.
या सामन्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र 4.5 षटकांनंतर पाऊस सुरू झाला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सामना सुरू झाला तेव्हा 21-21 षटके आधीच गमावली होती. सामन्याचा निर्णय 29-29 षटकांचा झाला, मात्र 12.5 षटकांनंतर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि सामना सुरू होऊ शकला नाही.
या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले होते. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे तर संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी, न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला. अॅडम मिल्नेच्या जागी मायकेल ब्रेसवेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
भारतीय संघ मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याची भारताकडे चांगली संधी होती. मात्र आता टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी असेल.
भारताची प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (सी), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टिम साउथी, लकी फर्ग्युसन.
New Zealand continue to make gains in the @MRFWorldwide ICC Men's #CWCSL Standings ?#NZvIND | Details ?https://t.co/YwWbGWu0iE
— ICC (@ICC) November 27, 2022
India vs New Zealand 2nd ODI Rain Match Cancel