सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना अनिर्णित झाला आहे. भारताला विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. पाचव्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला. आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी उत्कृष्ट खेळ करत हा सामना अनिर्णितकडे नेला. या सामन्यात भारताचा पराभव टळला आहे. दरम्यान, या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सहा बाद ३१२ धावा केल्या. त्यानंतर आपला डाव घोषित करुन भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य दिले होते.
धावफलक असा
ऑस्ट्रेलिया – ३३८ आणि ३१२/६ (डाव घोषित)
भारत – २४४ आणि ३३४/५
https://twitter.com/ICC/status/1348555796200583169