मेलबर्न – कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी अवघ्या ७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने ते २ गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. त्यामुळे या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे.
भारताचा हा या वर्षीचा पहिलाच कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियात भारताचा हा आठवा विजय आहे. भारताने मेलबोर्नमध्ये १९७८, १९८१, २०१८ आणि २०२० मध्ये विजय मिळविला. पोर्ट ऑफ स्पेन, किन्ग्स्टन आणि कोलोम्बो येथे प्रत्येकी एक कसोटी जिंकली आहे.
आज चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. बुमराहने कमिन्स आणि ग्रीन यांची जोडी फोडली. कमिन्स २२ धावांवर तंबूत गेला. त्यानंतर ग्रीन ४५ धावात, लियॉन ३ आणि हेजलवूड १० धावांवर बाद झाला. सिराजने ३, बुमराह व जडेजाने प्रत्येकी २ आणि यादव व अश्विनने प्रत्येकी १ गडी बाद केला. त्यानंतर भारताचा डाव सुरू झाला. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा लवक बाद झाले. शुभम गिलने नाबाद ३५ आणि अजिंक्य रहाणेने नाबाद २७ धावा करीत भाजराता विजय प्राप्त करुन दिला.
कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताचा मानहानिकारक पराभव झाला. आता भारताने दुसरी कसोटी जिंकल्याने मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.
धावफलक असा
ऑस्ट्रेलिया – १९५/१० आणि २००/१०
भारत – ३२६/१० आणि ७०/२