ॲडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. विजयासमोरील अवघे ९० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ २ गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
आज सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांमध्येच तंबूमध्ये परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या ९० धावा हव्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाज कमाल करणार की ऑस्ट्रेलियन फलंदाज विजयश्री खेचून आणणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय प्राप्त केला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस काल भारताने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज भारताने खेळ सुरू केला आणि अवघ्या २७ धावातच भारताचे ९ फलंदाज बाद झाले. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पॅट कमिन्सने ४ तर जोश हॅझलवूडने ५ गडी बाद केले. भारताचे ३ गडी शून्यावरच बाद झाले. विशेष म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला २ आकडी संख्या गाठता आली नाही. मयांक अगरवालने सर्वाधिक ९ धावा केल्या.
—
धावफलक असा
पहिला डाव
भारत – २४४/१०
ऑस्ट्रेलिया – १९१/१०
दुसरा डाव
भारत – ३६/१०
ऑस्ट्रेलिया – ९३/२
—
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वप्रथम झालेला वन डे सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. त्यानंतर झालेली टी २० सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. आता कसोटी मालिका सुरू आहे. त्यात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे,