मेलबोर्न – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी २० सामन्यात भारताने दिलेल्या १६२ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाला २० षटकात केवळ १५० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला आणि टी २० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या. त्यात के एल राहूलने सर्वाधिक ५१, रविंद्र जडेजाने नाबाद ४४ धावा केल्या. मोईसेस हेन्रिक्सने ३, मिचेल स्टार्कने २ आणि एडम झाम्पाने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्यावतीने डॉसी शॉर्टने ३४, एरोन फिंचने ३५, मोईसेस हेन्रिक्सने ३० धावा केल्या. भारताच्यावतीने थंगरसू नटराजनने ३, यजुवेंद्र चहलने ३ आणि दीपक चहरने १ गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात ७ दडी बाद १५० धावा केल्या.
एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला २-० ने मात दिली आहे. त्याचा वचपा भारत टी २० मालेकत काढणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यामुळे पहिल्याच टी २० सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यानुसार भारताने १-० अशी आघाडी घेऊन टी२० सामन्याच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचे संकेत दिले आहेत.