सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलियातील टी२० मालिकेतील अखेरचा सामन्यात भारताला पराभूत करुन ऑस्ट्रेलियाने लाज राखली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, भारतीय संघ १७५ धावाच करु शकला. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने ही मालिका जिंकली आहे. तर, तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने आपली पत सांभाळली आहे.
भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आणि सलामीवीर के एल राहूल शून्य धावांवरच बाद झाला. भारताच्यावतीने सर्वाधिक धावा विराट कोहलीने ८५ एवढ्या केल्या. कोहलीने टी२० मधील २५वे अर्धशतक ठोकले. त्याच्या पाठोपाठ शिखर धवनने २८, हार्दिक पांड्याने २०, संजू सॅमसनने १० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्यावतीने मिचेल स्विप्सनने ३, ग्लेन मॅक्सवेलने १, अँड्र्यू टाईने १ आणि एडम झंपाने प्रत्येकी १ खेळाडू बाद केला. शेवटच्या षटकात भारताला तब्बल २७ धावा हव्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर मैदानावर होते. पण, त्यांना भारताला यश मिळवून देता आले नाही.
ऑस्ट्रेलियाने २० षटकात ५ गडी बाद १८६ धावा केल्या. मॅथ्यु वेडने सर्वाधिक ८०, ग्लेन मॅक्सवेलने ५४, स्टीव्हर स्मिथमने २ धावा केल्या. भारताच्यावतीने वॉशिंग्टन सुंदरने २, थंगरसु नटराजनने १ आणि शार्दूल ठाकूरने १ गडी बाद केला. ताजे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ५ षटकात ४४ धावा झाल्या आहेत.
भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने पहिले दोन सामने जिंकून या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलिया वचपा काढणार की भारत हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारताला एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत करुन मालिका खिशात घातली. आता भारताने टी २० मालिका जिंकली आहे.