मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरी असो की उद्योग व्यवसाय बहुतांश जणांना उत्पन्न जास्त असेल तर कर भरावाच लागतो. कर भरण्यासाठी मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी प्राप्तीकर परतावा जमा करण्याची तारीख आता जवळ आली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात निर्धारीत केलेल्या कमाईपेक्षा अधिकच्या उत्पन्नावर नागरिकांना कर जमा करावा लागतो. त्यांना प्राप्तीकर परतावा द्यावा लागतो.
आपण जर सरकारने निर्धारीत केलेल्या करपात्र उत्पन्नाच्या परीघात येत असाल तर कर चुकवेगिरी करु शकत नाहीत. अधिकच्या उत्पन्नावर कर जमा करावा लागतो. कर भरणे राष्ट्रीय कर्तव्य समजल्या जाते, त्यामुळे अनेक नागरिक प्रामाणिकपणे कर ही भरतात. तसेच कर भरताना तुम्हाला गुंतवणुकीच्या आधारावर सवलत, सूट ही देण्यात येते. हे एक प्रकारे कर भरण्यासाठीचे प्रोत्साहन असते.
विशेष म्हणजे करदात्यांना त्यांच्या अनेक प्राप्त उत्पन्नावर कर जमा करण्याची गरज नसते तर अशाच कमाईचं साधन असणाऱ्या पण करपात्र नसलेल्या उत्पन्नाविषयी आपल्या माहिती असणे आवश्यक ठरते. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी भारत सरकार कृषी उत्पन्नावर सरकार कुठलाही कर आकारत नाही. हे उत्पन्न कराच्या परीघात येत नाही. पण शेतकरी कृषी उत्पन्ना व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतापासून उत्पन्न घेत असेल तर ते उत्पन्न मात्र करपात्र ठरते.
शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न करपात्र ठरते आणि त्यावर कर जमा करावा लागतो. आर्थिक वर्षात इक्विटी शेअर आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्सच्या विक्रीवरील उत्पन्नावर ही कर लागत नाही. हे उत्पन्न कराच्या परीघात येत नाही. जर गुंतवणूकदार 1 ते 3 वर्षांसाठी एखाद्या शेअर वा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असेल आणि त्याला त्यातून फायदा, नफा मिळाला असेल तर असे उत्पन्न दीर्घ कालीन लाभात येते.
भविष्य निर्वाह निधीत पगारदार व्यक्तीची रक्कम जमा होत असते. या जमा रक्कमेवर पगारदार व्यक्तीला व्याज ही मिळते. तसेच ही रक्कम काढताना कुठलाही कर द्यावा लागत नाही. परंतू, त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. जर ५ वर्षांच्या आत पीएफ मधील रक्कम काढाल तर तुमचे उत्पन्न करपात्र ठरते आणि त्यावर कर आकरल्या जातो. परंतू ५ वर्षानंतर रक्कम काढणे गरजेचे असेल तर त्यावर कर लागत नाही.
एखाद्या कंपनीसोबत दीर्घकालीन सेवा बजावल्यास कर्मचाऱ्याला एक बक्षिस मिळते. या बक्षिसीला ग्रॅज्युईटी म्हणतात. सध्याच्या नियमानुसार, संपूर्ण करियर दरम्यान ग्रॅज्युईटीपासून सुमारे 20 लाखांची कमाई ही करपात्र नाही. पण त्यापुढील उत्पन्न करपात्र आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅज्युईटी ही संपूर्णपणे कर मुक्त आहे, असा नियम आहे.
Income Tax Return Rule Tax Free Income Exemption Agriculture Gratuity PF Gift