नवी दिल्ली – सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक जण आपली उर्वरित कामे आटोपून नव्या वर्षाची नवी सुरुवात करत आहेत. या कामांच्या यादीत ज्यांनी प्राप्तीकर भरण्याचे काम नोंदवून ठेवले असेल. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्राप्तीकर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर म्हणजेच आज आहे. परंतु त्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत ५.३६ कोटी प्राप्तीकर परतावा भरण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास २७ लाख रुपयांचा परतावा गुरुवारी भरण्यात आला आहे. आधी ३१ जुलैवरून ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. गेल्या वर्षी प्राप्तीकर भरण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत. होती.
प्राप्तीकर विभागाच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, २०२१-२२ वर्षासाठी गुरुवारी (३०) रात्री आठ वाजेपर्यंत ५.३४ कोटी रुपयांहून अधिक प्राप्तीकर भरण्यात आला आहे. त्यामध्ये २४.३९ लाख रुपये प्राप्तीकर गुरुवारीच भरण्यात आला आहे. २.७९ लाख रुपये प्राप्तीकर अंतिम तासांत भरण्यात आला आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत भरण्यात आलेल्या प्राप्तीकरांची संख्या ५.३६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी मुदतवाढीनंतर १० जानेवारी २०२१ पर्यंत एकूण ५.९५ कोटी प्राप्तीकर भरण्यात आला होता.
विलंबासाठी किती दंड
३१ डिसेंबर रोजी दिलेल्या मुदतीत प्राप्तीकर भरता आला नाही तर दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. प्राप्तीकर भरण्याची मुदत उलटल्यानंतर पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. गेल्या वर्षीपर्यंत दंडाची जास्तीत जास्त रक्कम दहा हजार रुपये होती. त्यानंतर ती घटवून पाच हजार रुपये करण्यात आली आहे.
प्राप्तीकर ऑनलाइन कसा भरावा
– सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगिन करावे.
– येथे फाइल>इनकम टॅक्स रिटर्न्स>फाइल इनकम टॅक्स रिटर्नवर जावे.
– त्यानंतर असेसमेंट इयर, फायलिंग टाइप आणि स्टेटस निवडा.
– प्रोसिडवर क्लिक करा.
– आयटीआरची निवड करून फाइल करण्याचे कारण निवडावे.
आवश्यक माहिती भरून जर पेमेंट होत असेल तर भरपाई करा.
– प्रिव्ह्यूवर क्लिक करून प्राप्तीकर भरावा.
– व्हेरिफिकेशनसाठी प्रोसिडवर क्लिक करा.
– व्हेरिफिकेशन मोडवर क्लिक करा.
– EVC/OTP भरून आयटीआर व्हेरिफाय करा. आयटीआर-व्ही चे सिग्नेचर्ड कॉपी व्हेरिफिकेशनसाठी सीपीसी पाठवा.