नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्राप्तीकर अर्थात इन्कट टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ येत आहे. जे आयटीआर भरण्यास पात्र आहेत त्यांनी तो भरायचा आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत निर्धारित करण्यात आली आहे. तेव्हा पात्र करदात्यांनी त्वरा करत मुदतीपूर्वी आयटीआर भरायचा आहे. अन्यथा पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
आयटीआर रिटर्न हा एक अर्ज असतो. त्याचा उपयोग कर देण्यासाठी करण्यात येतो. भारतीय प्राप्तिकर खाते तुमची कमाई, संपत्तीवर काही ठराविक कर आकारण्यात येतो, आयटीआर हा इलेक्ट्रॉनिक मोडच्या माध्यमातून जमा करण्यात येतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्यक्षस्वरुपात कर जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. करपात्र व्यक्ती, कृत्रिम न्यायिक व्यक्ती, एखादी फर्म, सार्वजनिक न्यास, ट्रस्ट, कंपनी अथवा समाजाचा एक घटक करदात असतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही. केवळ एक फॉर्म जमा करावा लागतो.
आर्थिक वर्ष २०२२-१३ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी ३१ जुलै २०२३ ही अखेरची तारीख असेल. याअंतर्गत टॅक्सेबल इनकम असलेल्या लोकांना इनकम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागत असतो. आपण ओल्ड कर प्रणाली अथवा नव्या कर प्रणाली अंतर्गत आयकर भरू शकता अथवा आयटीआर फाइल करू शकता. या दोन्ही कर प्रणालीत टॅक्स स्लॅब वेगवेगळा आहे. आपल्याला टॅक्स भरावा लागत असले तर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल करावा लागेल.
फेब्रुवारी महिन्यातच आला फॉर्म
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून फेब्रुवारी महिन्यात आयटीआर फॉर्म जारी करण्यात आले होते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कंपन्यांकडून फॉर्म १६ जारी करण्यात आला होता. आता जस-जशी ३१ जुलै तारीख जवळ येईल, तसतसे इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर ट्रॅफिक वाढत जाईल. यामुळे आपण वेळीच आयटीआर फाईल करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, वैयक्तिक आयकर भरणारे, व्यवसाय आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे आयटीआर फॉर्म असतात.