मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आयकर भरण्याची मुदत ३१ जुलै आहे. दरवर्षी आयकर भरणे आवश्यक असते. कोरोनामुळे केंद्र सरकारने यंदा आयकर भरण्यासाठी अधिकची वेळ दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही आयकर भरला नसेल तर तो आजच भरा. विशेष म्हणजे, यंदा मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केला आहे. त्यामुळे मुदतवाढीच्या भरवशारही तुम्हाला बसता येणार नाही. येत्या १ ऑगस्ट किंवा त्यानंतर तुम्ही तो भरला तर मात्र तुम्हाला चांगलेच महागात पडेल.
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा आयकर ३१ डिसेंबर २०२१ रोजी भरण्यात आला आहे. आता ३१ जुलै पर्यंत तुम्हाला २०२१-२२ या वर्षाचा आयकर भरायचा आहे. ३१ जुलै रोजी दिलेल्या मुदतीत प्राप्तीकर भरता आला नाही तर दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. प्राप्तीकर भरण्याची मुदत उलटल्यानंतर पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. गेल्या वर्षीपर्यंत दंडाची जास्तीत जास्त रक्कम दहा हजार रुपये होती. त्यानंतर ती घटवून पाच हजार रुपये करण्यात आली आहे.
असा भरा ऑनलाईन आयकर
– सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगिन करावे.
– येथे फाइल>इनकम टॅक्स रिटर्न्स>फाइल इनकम टॅक्स रिटर्नवर जावे.
– त्यानंतर असेसमेंट इयर, फायलिंग टाइप आणि स्टेटस निवडा.
– प्रोसिडवर क्लिक करा.
– आयटीआरची निवड करून फाइल करण्याचे कारण निवडावे.
आवश्यक माहिती भरून जर पेमेंट होत असेल तर भरपाई करा.
– प्रिव्ह्यूवर क्लिक करून प्राप्तीकर भरावा.
– व्हेरिफिकेशनसाठी प्रोसिडवर क्लिक करा.
– व्हेरिफिकेशन मोडवर क्लिक करा.
– EVC/OTP भरून आयटीआर व्हेरिफाय करा. आयटीआर-व्ही चे सिग्नेचर्ड कॉपी व्हेरिफिकेशनसाठी सीपीसी पाठवा.
Income Tax Return Deadline 31st July after that Penalty and Details