मुंबई – आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विविध साखर कारखान्यांवर आज सकाळपासून धाडी टाकण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर पवार म्हणाले की, केंद्रीय संस्थांवर सध्या भाजपची मालकी दिसते आहे. केंद्रीय संस्थांकडून महाराष्ट्रात आजवर अनेकांवर कारवाई झाली आहे. मात्र, यात एकही भाजपचा नेता नाही. त्यांच्याविषयी तक्रारी नाही की अन्य काही कारण आहे, असा सवाल पवार यांनी विचारला आहे.
पवार म्हणाले की, माझ्या नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींवर धाडी टाकणे हे अतिशय दुर्दैवी आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण होणं हे अत्यंत वाईट आहे. माझ्यावर धाड टाकली तर काही वाटणार नाही. पण, माझी बहिण आहे.य माझं नातं आहे म्हणून धाड टाकत आहेत. केंद्र आणि राज्य दोघांनंही त्यांचं काम करावे. देशाचा विकास करण्यासाठी जनतेने यांना सत्ता दिली. त्याचा ते कसा वापर करीत आहेत हे जनतेला दिसून येत आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित दौंड, आंबालिक, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सकाळपासूनच आयकवर विभागाची पथके या कारखान्यांमध्ये पोहचली आहेत.
https://twitter.com/ANI/status/1446042803423825921