नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीबीसीचे कार्यालय सील करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. बीबीसीच्या लंडन मुख्यालयालाही या छाप्याबाबत माहिती देण्यात आली आहे. दिल्लीसोबतच मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
Income Tax department teams at BBC's Delhi and Mumbai offices, conducting survey operation: officials
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६०-७० सदस्य असलेल्या आयकर विभागाच्या टीमने बीबीसीच्या कार्यालयात पोहोचून तपास सुरू केला. कार्यालयात येण्या-जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे बीबीसीवर आयटीच्या छाप्याचे वृत्त आल्यानंतर काँग्रेस पक्षाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने ट्विट केले की, “आधी त्यांनी बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घातली आणि आता आयकर विभागाने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे.”
यहां हम अडानी के मामले में JPC की मांग कर रहे हैं और वहां सरकार BBC के पीछे पड़ी हुई है।
'विनाशकाले विपरीत बुद्धि'
: @Jairam_Ramesh जी pic.twitter.com/PvQ57tMTVP
— Congress (@INCIndia) February 14, 2023
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयटी अधिकारी कर चोरीच्या चौकशीच्या संदर्भात शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
Income Tax Raid on BBC Delhi and Mumbai Office Today