नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कानपूर व कन्नौजमधील अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर जप्ती तथा शोध मोहीम राबवून 196 कोटी रुपये रोख रुपये आणि सोने आणि चंदन तेल जप्त करण्यात आले. त्यानंतर आता आयकर विभागाने समाजवादी पक्षाचे आमदार आणि परफ्यूम व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पम्पी जैन यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. आतापर्यंत 9 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि 2 कोटींहून अधिक किंमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक बँक लॉकर्सही जप्त करण्याची आहेत.
आता विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून या छाप्यात काय सापडले आहे, असे सांगितले आहे. 31 डिसेंबर रोजी परफ्यूम व्यवसाय आणि रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित अनेक व्यापाऱ्यांच्या विविध ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. तसेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सुमारे 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात ही टोळी करचुकवेगिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या छाप्यात विभागाला मिळालेल्या पुराव्यावरून असे दिसून आले आहे की, विक्री कार्यालय आणि मुख्य कार्यालयात या गटाने सुमारे 40 टक्के कामे रोखीने केली आणि तीही कच्च्या बिलातून करण्यात आली. तसेच विविध शासकीय खात्याशी संबंधित नियमित बील बुकात या पैशांचा उल्लेख नव्हता. त्याचप्रमाणे सुमारे 5 कोटींच्या व्यवहाराशी संबंधित कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याचे विभागाने सांगितले.
विशेष म्हणजे या स्थावर मालमत्तांचा वापर मुंबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी केल्याचे पुराव्यावरून दिसून आले आहे. याशिवाय भारत आणि यूएईमध्ये मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या गटाने 10 कोटींचा कर चुकविल्याचीही माहिती समोर आली आहे. छाप्यांमध्ये कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असे आढळून आले आहे की, सदर कंपनीशी संबंधित अन्य घटकांची आणि त्यांच्या उत्पन्नाबाबत अचूक माहिती दिली नाही. तसेच 45 कोटींच्या उत्पन्नाबाबतही अचूक माहिती सांगितलेले नाही.
समूहाशी संबंधित UAE-आधारित भागधारकाने भारतीय भागीदारासह 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल शेअर केले आहे. यातील काही भागधारकांकडे यूएईमध्ये आलिशान घरे असल्याचेही समोर आले आहे. अशा अनेक गैरप्रकारांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील या गटाने पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचेही आढळले आहे. यात सुमारे 12 कोटी रुपयांचे रोख व्यवहार आढळून आले असून त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत रोख रक्कम व दागिन्यांसह एकूण सुमारे 12 कोटींहून अधिक किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.