जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ तसेच स्टील उद्योगाच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले जालना शहर अचानकपणे गेल्या आठवड्याभरा पासून वेगळ्याच गोष्टीने प्रसिद्धीच्या झोतात आले आहे, कारण आयकर विभागाच्या छापेमारीत येथे एका स्टील व्यवसायिकाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. १ ) राज्यातील सत्तांतरानंतर जालना जिल्ह्यात आयकर विभागाकडून प्रचंड मोठा छापा टाकण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर हे छापे टाकायला सुरुवात झाली होती. या छापेमारीत एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता हाती लागल्याची माहिती आहे. यामध्ये ५८ कोटी रुपयांची रोकड आणि ३२ किलो सोन्याचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे तब्बल २६० कर्मचारी या छापेमारीत सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे या छापेमारीदरम्यान मोठी रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाने १२ मशिन्स वापरल्या. मात्र, इतक्या मशिन्स वापरुनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येऊ शकतो. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर पेक्षा मराठवाडयातील जालनासारख्या तुलनेने लहान जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे इतक्या मोठ्याप्रमाणात बेहिशेबी संपत्ती सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याप्रमाणे औरंगाबादमधील व्यावसायिकांवरही अशाचप्रकारे छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
जालन्यातील आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या संपत्तीचे आकडे हे चक्रावणारे आहेत. जालन्यातील स्टील व्यावसायिकांकडे रोकडे आणि सोन्याबरोबरच हिरे, मोती असा ऐवजही आढळून आला. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. महत्त्वाचे म्हणजे इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले.एकूण 12 मशील रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची सांगण्यात येते.
आयकर खात्याच्या या छापेमारीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. १ ऑगस्ट रोजी हे छापासत्र राबवण्यास सुरुवात झाली, ८ ऑगस्टपर्यंत सुरु होते. या मोहीमेत एकूण २६० कर्मचारी दाखल झाले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाल्याचा सुगावा कोणालाही लागू नये, यासाठी हे सर्वजण वेगवेगळ्या वाहनांतून याठिकाणी दाखल झाले होते. या कारवाईत जालना जिल्ह्यातील चार बड्या स्टील कारखानदारांची झडती घेण्यात आली. एकाचवेळी आयकर विभागाची विविध पथकं या स्टील उत्पादकांशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापे टाकत होती. त्यावेळी आयकर खात्याच्या हाती मोठे घबाड लागले.
https://twitter.com/HimanshuDixitt/status/1557577487097679872?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्याच्या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने राज्य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. सध्या जालना जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री व शिंदे गटाचे (शिवसेनेचे ) ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते.
गेले आठ दिवस इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल १०० अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने मारलेल्या छापमारीमध्ये सुरुवातील कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र त्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसवर छापा टाकला. तिथे तपास केला.
या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यंमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आलीय. इतकंच काय तर अडगळीमधील काही पिशव्यांमध्येसुद्ध रोकड सापडली. मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते. तर दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातच अशाचप्रकारे रोख रक्कम आढळून आली. इनकम टॅक्स विभागाने मारलेल्या छापेमारीत जालन्यातील चार मोठ्या स्टील व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यावसायिकांची नावे अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, औरंगाबाद पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एक ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण शहरात पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर व ऑफिसवर छापा टाकला होता.
https://twitter.com/MohammedAkhef/status/1557586678243504128?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
या छाप्यात आढळून आलेली रोख रक्कम स्थानिक स्टेट बँकेत नेण्यात आली. तिथे सकाळी ११ वाजता या रोख रकमेची मोजणी सुरु करण्यात आली होती. ही मोजणी तब्बल 1१४ तासांनी म्हणजे मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे इतके प्रचंड मोठे कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडल्याने मागील महिन्यात पश्चिम बंगालमधील टाकलेल्या छाप्याची सर्वांना आठवण झाली.
Income Tax Raid at Jalna Big property Cash Found
390 crore unaccounted property
Marathwada Big Operation