विशेष प्रतिनिधी, मुंबई
करदात्यांना दिल्यासाठी नवी वेबसाईट लॉन्च करुन आठवडा होत नाही तोच तक्रारींचा पाऊस आयकर विभागाकडे सुरू झाला आहे. वेबसाईटमुळे करदाते त्रस्त झाले असून सनदी लेखापालांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आयकर (प्राप्तिकर ) विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल लाइव्ह झाल्यानंतर आता आठवड्यानंतर पुन्हा वापरकर्त्या करदात्यांना पुन्हा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात एका चार्टर्ड अकाउंटंट्सने सांगितले की नोटीसला प्रतिसाद देत सामान्य लॉगिंग वेळेपेक्षा अधिक सर्व सुविधा अद्याप कार्यरत नाहीत.
कर विभागासह करदात्यांना सोयीचे व्हावे, या उद्देशाने ७ जून रोजी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ हे नवीन पोर्टल लाँच करण्यात आले. परंतु वापरकर्त्यांनी पहिल्या दिवसापासूनच तक्रारी करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत या तक्रारीचे निराकरण झाले नाही. त्यामुळे करदात्यांना पूर्वीच्या ई-फाईल रिटर्न्स पाहणे शक्य होत नाही.
प्राप्तिकर विभागाचे नवीन कर फाईलिंग पोर्टल सुरू झाल्यानंतर दुसर्याच दिवसानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अर्थमंत्र्यांना नवीन ई-फाइलिंग पोर्टलमधील त्रुटींविषयी माहिती दिली होती. तसेच इन्कम टॅक्स भरण्याची नवीन व सुधारित प्रणाली विकसित करण्यासाठी वर्ष २०१९ मध्ये इन्फोसिसला कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे लवकरात लवकर आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटमधील तांत्रिक त्रुटी सुधारण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.