आयकर विभागाची ई-व्हेरिफिकेशन योजना- २०२१
आर्थिक वर्ष 2022-23 नुकतेच संपले असून करदाते तसेच सर्वसामान्य लोक आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत असून माहिती व टेक्नॉलॉजीचा वापरामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आयकर विभागाची ई-व्हेरिफिकेशन योजना- 2021 हि देखील एक महत्वपूर्ण संगणकीकृत कार्य प्रणाली आहे. याच बद्दल आपण सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
*काय आहे आयकर विभागाची ई-व्हेरिफिकेशन योजना, 2021*
ई-व्हेरिफिकेशन योजना, 2021 ही योजना आयकर कायदा 1961 कलम 135 A च्या तरतुदी अंतर्गत आहे जी केंद्र सरकारला माहितीचे फेसलेस संग्रह करण्याचा अधिकार देते.
उत्पन्नाचा परतावा भरताना तुम्ही विचारात घेतले/समाविष्ट केलेले आर्थिक व्यवहार तसेच विविध स्रोत व डेटाच्या माध्यमातून आयकर विभागाकडे नोंदविण्यात आलेले आर्थिक व्यवहार यातील विसंगती ओळखण्याची संगणकीकृत प्रक्रिया आहे.
आयकर कार्यालयाकडून करदात्यांना स्वतःहून करप्रणालीला मान्यता देण्यासाठी e-Verification Scheme आणली आहे. यामुळे ही प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे आता करदात्यांना आर्थिक व्यवहार, अन रिपोर्टेड किंवा अंडर रिपोर्टेड आहे का याची माहिती मिळणार आहे. आयकर विभागामार्फत करदात्यांना त्यांच्या मेल वरती नोटिसा प्राप्त होत आहेत. ज्या करदात्यांना अशा स्वरूपाच्या नोटिसा प्राप्त होत आहे त्यांनी आधी हे समजुन घेतले पाहिजे कि ई-व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकी काय आहेत.
*ई-व्हेरिफिकेशन स्कीम, 2021 ची फायदे*
करदात्यांना त्यांच्या व्यवहारांची ऐच्छिक परिपूर्तता करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आलेली आहेत याचाच एक भाग म्हणून AIS द्वारे माहिती उपलब्ध करून देणे याचबरोबर उत्पन्नाचा परतावा भरणे ही सर्वात अलीकडील प्रक्रिया आहे.
– विविध स्रोतच्या/डेटाच्या माध्यमातून प्राप्त झालेली माहिती बरोबर आहे कि नाही हे तपासणे तसेच चुकीची माहिती दुरुस्त करणे
– उत्पन्न आणि करांची गणना करताना किंवा उत्पन्नाचा परतावा भरण्यात चुकले असल्यास अशा विविध व्यवहाराबाबतची माहिती करदात्यांच्या निदर्शनास आणून देणे
– करदात्याला रिटर्न मधील कोणतीही चूक सुधारण्याची संधी प्रदान करणे. आधीच्या मूळ उत्पन्नाच्या परताव्यात उत्पन्न चुकलेले असेल तर अद्ययावत विवरणपत्र भरून उत्पन्नाचा परतावा आणि देय कर अचूक भरणे.
– करदात्याला व्यवहार समजावून घेण्याची हि एक उत्तम संधी प्रधान करते जी आपल्याला पुढील मूल्यमापन किंवा पुनर्मूल्यांकनाद्वारे पुढील कोणत्याही कारवाईपूर्वी सत्यापित केली जाते व भविष्यातील नोटीसा पासून निश्चिन्त होता येते.
*आयकर विभागाला प्राप्त झालेली माहिती कोठे पाहू शकतो*
प्राप्तिकर विभागाकडे तुमच्या आर्थिक व्यवहार बद्दलची माहिती विविध स्रोतच्या/डेटाच्या माध्यमातून प्राप्त असते TDS/TCS आकर्षित करणाऱ्या पावत्या, स्थावर मालमत्ता खरेदी किंवा विक्री, बँक ठेवी, शेअर्स/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, मुदत ठेवी इत्यादींची माहिती तुम्ही तुमच्या आयकर खात्याच्या AIS पोर्टलवर व्यवहार पाहू शकता.
*ई-फायलिंग पोर्टलवर खालील URL वापरून लॉग इन करा*
https://eportal.incometax.gov.in/
मुख्यपृष्ठावर “सेवा” Services टॅबवर क्लिक करा “सेवा” टॅब अंतर्गत मेनूमधील “वार्षिक माहिती विधान (AIS)” निवडा, तुम्हाला AIS पोर्टलवर नेले जाईल. AIS पोर्टलवर संबंधित आर्थिक वर्ष निवडा आणि आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी “वार्षिक माहिती विवरण” वर क्लिक करा.
वर वर्णन केल्याप्रमाणे, एकदा तुम्ही AIS अंतर्गत माहिती पाहत असाल, तेव्हा विशिष्ट माहितीवर क्लिक करा. एकदा माहिती तपशील पाहिल्यानंतर उजव्या बाजूला एक फीडबॅक बटण आहे ज्याचा वापर करून करदाता उपलब्ध मेनू पर्यायांमधून फीडबॅक देऊ शकतो.
या सर्व बाबी आपल्याला माहित असल्या तरी देखील काही विशिष्ट व्यवहारांबाबत माहिती सादर करतांना किंवा नोटीसेसला उत्तर पाठविताना आपण आपल्या कर/आर्थिक सल्लागार यांच्या सल्ला घेणे अधिक योग्य व फायदेशीर होईल.
Income Tax E Verification Scheme Details