मुंबई – आयकर विभागाने 1 एप्रिल ते 2 आगस्ट 2021 या कालावधीत 21.32 करदात्यांना त्यांचे 45 हजार 896 कोटी रुपये परत केले. आयकर विभागाने स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. यात व्यक्तिगत पातळीवर 20.12 करदात्यांना 13 हजार 694 कोटी आणि संस्थात्मक पातळीवर 1.19 करदात्यांना 32 हजार 203 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. यापूर्वी सीबीडीटीने चालू आर्थिक वर्षात 26 जुलैला 43 हजार 991 कोटी रुपये रिफंड केले होते.
अर्जात बँक खात्याची चुकीची माहिती
आयकर विभाग आता केवळ बँक खात्यातच रिफंड पाठवतो. अश्यात जर अर्ज भरताना बँकेचा अकाऊंट नंबर चुकीचा टाकला तर रिफंड अडकू शकतो. त्यात तुम्ही आयकर विभागाच्या माध्यमातूनच सुधारणा करू शकता. तुम्ही आनलाईन सुद्धा खात्याची माहिती बदलू शकता. यासोबतच हेदेखील महत्त्वाचे आहे की तुम्ही ज्या बँकेची माहिती देत आहात त्या बँकेतील खाते पॅन कार्डशी जुळलेले असावे.
खाते अपडेट असावे
बरेचदा वेळेत रिफंड न मिळण्यामागे खाते अपडेट नसणे हेदेखील एक कारण असते. केवायसीमध्ये अडचणी असतील तर आयटी रिफंड अडकून बसते. त्यामुळे आयकर विभागाशी जोडलेले बँक खाते वेळेत सत्यापित करणे आवश्यक आहे. आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बरेचदा असे होते की लोक वेळेवर रिटर्न भरतात आणि व्हेरिफाय करायला विसरतात. जोपर्यंत तुम्ही खते व्हेरिफाय करणार नाही, तोपर्यंत रिटर्नची प्रक्रिया सुरू होणार नाही.
स्टेटस तपासा
रिफंड का येत नाही, याची माहिती तुम्ही घेऊ शकता. हे स्टेटस तपासण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगईन करू शकता. यात तुम्हाला रिफंड न येण्याचे कारण कळू शकेल.