मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जनावरांचे मांस ( बीफ) निर्यात करणा-या एका कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबई आग्रा महामार्ग जवळ पवारवाडी शिवारात हा कारखाना असून गेल्या काही तासांपासून येथे आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहे. या कारवाईत एका सीएची सुध्दा चौकशी करण्यात आली आहे. या बीफ कंपनीच्या मुंबई व पुणे येथील कार्यालयावरही असे छापे टाकण्यात आल्याची चर्चा आहे. या कंपनीने टँक्स चुकवल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत आयकर विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा छापा आहे सर्व्हे याबाबतही विभागाने सांगिलले नाही. पण, कोट्यावधी रुपयाची या कारखान्यातून होत असल्यामुळे आयकर विभागाच्या रडारवर हे कत्तलखाने होते. त्यातून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.