इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रशासित प्रदेश असलेल्या वापीमध्ये आयकर विभागाच्या छाप्यांनी एकच खळबळ उडाली आहे. उद्योग नगर येथील शाह पेपर मिलच्या युनिटसह मुंबई कार्यालय आणि व्यवस्थापकांच्या निवासस्थानासह एकूण १८ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शाह पेपर्स ही देशातील पांढरा पेपर तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीने ३५० कोटींहून अधिक कर चुकवल्याचा आरोप आहे.
आयकर विभागाने झडतीदरम्यान दोन कोटी रुपयांची रोकड आणि दोन कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. गेल्या ६-७ वर्षांत बनावट तोटा दाखवून कर चुकवल्याचा आरोप कंपनीवर आहे. आयकर विभागाने सांगितले की, छाप्यांमध्ये २.२५ कोटी रोख, २ कोटींचे दागिने, कर्ज आणि लेजरसह खरेदी-विक्रीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर करचोरी उघड होईल. करचुकवेगिरीचे आकडे तपासानंतरच बाहेर येतील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
Income Tax Department Raid 18 Places Vapi