इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयकर विभागाने झारखंडमधील काँग्रेसचे दोन आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह काही व्यावसायिकांवर आज छापे टाकले. त्यात विभागाने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे बेनामी व्यवहार आणि गुंतवणूक उघडकीस आणली आहे. सेंटल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने दिलेल्या माहितानुसार, झारखंडमधील रांची, गोड्डा, बर्मो, दुमका, जमशेदपूर, चाईबासा, बिहारच्या पाटणा, हरियाणाच्या गुरुग्राम, पश्चिम बंगालच्या कोलकाता यासह ५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. आयकर अधिकार्यांनी छाप्यांमध्ये २ कोटी रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे, ज्याची मोजणी करण्यासाठी मशीन आणावे लागले.
कुमार जयमंगल उर्फ अनूप सिंह आणि प्रदीप यादव या काँग्रेसच्या दोन आमदारांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला. बर्मो मतदारसंघाचे आमदार, जयमंगल यांच्या रांचीमधील निवासस्थानाबाहेर या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. तपासात सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सध्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील जेएमएमसोबत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ही आयकर विभागासाठी धोरण बनवणारी संस्था आहे. सीबीडीटीने सांगितले की, लोह खनिज उत्खनन, लोह उत्पादन, कोळशाचा व्यापार, वाहतूक आणि करारामध्ये गुंतलेल्या काही व्यावसायिक गटांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्या परिसराची झडती घेण्यात आली, त्यापैकी दोघे राजकीयदृष्ट्या संबंधित आणि त्यांचे सहकारी आहेत.
सीबीडीटीने सांगितले की, २ कोटींहून अधिक रोख देखील जप्त करण्यात आले आहेत आणि आतापर्यंत १०० कोटींहून अधिक बेनामी व्यवहार/गुंतवणूक आढळून आली आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही सापडले आहेत. “या पुराव्यांचे प्राथमिक विश्लेषण असे सूचित करते की या गटांनी करचुकवेगिरीसाठी विविध मार्ग अवलंबले आहेत.
जयमंगल यांनी ऑगस्टमध्ये त्यांच्या पक्षाचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कोंगारी यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती आणि आरोप केला होता की ते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जुलै महिन्यात पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांना रोख रकमेसह अटक करण्यात आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. राज्य काँग्रेसचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी छाप्याच्या दिवशी आरोप केला होता की कर विभागाची कारवाई गैर-भाजप शासित राज्यांमधील सरकारे अस्थिर करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.
Jharkhand: IT dept raids unearth Rs 2 cr in cash, Rs 100 cr unaccounted investments, transactions
Read @ANI Story | https://t.co/uGhuyw7vEd#Jharkhand #IncomeTax #CBDT pic.twitter.com/KGjHysU3fL
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2022
Income Tax Department Raid 1 MLA Found Big Cash