मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांगल्या मार्गाने कुणी किती पैसा कमवावा, याची कुठलीही मर्यादा कोणत्याही सरकारने घालून दिलेली नाही. मात्र प्रत्येक पैशाचा हिशोब मात्र आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. विशेषतः एक नोकरी करून इतर कामांच्या माध्यमातून पैसा कमावणाऱ्या लोकांना तर यापुढे सतर्क राहावेच लागणार आहे.
मुख्य म्हणजे एखाद्या कंपनीसोबत करार झाल्यानंतर त्या कंपनीव्यतिरिक्त इतर कुठल्याही कंपनीसाठी काम करता येत नाही. आणि काम केले तरी त्यातून पैसा कमावता येत नाही. असा सरळ नियम आहे. मात्र बरेचदा एका कंपनीच्या पगारावर घर चालविणे कठीण झाल्याने बहुतांश लोकांना उत्पन्नाचे इतर स्त्रोत शोधावेच लागतात. पण आयकर विभागाच्या नियमानुसार ज्या कंपनीकडून फॉर्म १६ मिळतो, त्या कंपनीला उत्पन्नाची माहिती देताना ‘इन्कम प्रॉम अदर सोर्सेस’ या कॅटेगरीमध्ये इतर उत्पन्नाची माहिती द्यावी लागते.
पण तसे कुणीही करत नाही. तरीही आयकर विभागाने त्यात सुट दिली असून संबंधित व्यक्ती रिटर्न भरतानाही आयकर विभागाला ही माहिती देऊ शकतो, असा नियम आहे. बरेच लोक तसे करत नाहीत, कारण सात लाख रुपयांपर्यंत आयकर लागत नाही. मात्र आता सात लाखाच्या आत असो वा बाहेर असो पगाराच्या व्यतिरिक्त होणाऱ्या कमाईची माहिती आयकर विभागाला द्यावीच लागणार आहे. तसे केले नाही तर आयकर विभागाची नोटीस आल्याशिवाय राहणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
११०० लोकांना नोटीस
ज्यांचे उत्पन्न ५ ते १० लाखाच्या दरम्यान आहे, अशा ११०० लोकांना आयकर विभागाने अतिरिक्त उत्पन्नाची माहिती दिली नाही म्हणून नोटीस बजावल्या आहेत. बहुतांश लोकांना २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षात नोटीस मिळाल्या आहेत. हे दोन्ही वर्ष कोरोना काळात मोडले जातात. अशा परिस्थितीत अनेकांना कंपनी अर्धाच पगार देत होती. त्यामुळे इतर स्त्रोत शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आयकर विभाग हा युक्तिवाद ऐकून घेणार की नाही, याची खात्री नाही.
Income tax department gave this notice to 1100 people
Income tax department notices ITR Tax Payers
Double Income