मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्राप्तिकर विभागाने मुंबई आणि इतर भागांमध्ये टाकलेल्या छाप्याबाबत दिली ही माहिती

सप्टेंबर 18, 2021 | 5:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
income tax pune e1611467930671

मुंबई – प्राप्तिकर विभागाने आज मुंबईत एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या विविध संकुलांवर आणि पायाभूत सुविधा विकासात कार्यरत असलेल्या लखनौच्या एका उद्योग समूहावर देखील छापे घातले. मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील एकूण २८ संकुलांवर छापे घालून शोधमोहीम राबवण्यात आली आहे. या अभिनेत्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संकुलांमध्ये राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे आढळले आहेत. आपले बेहिशोबी उत्पन्न लपवण्यासाठी हा अभिनेता अनेक बनावट आस्थापनांच्या माध्यमातून तारणविरहित बनावट कर्जाचे वाटप करण्याच्या पद्धतीचा अवलंब करत होता.

आतापर्यंतच्या चौकशीत अशा प्रकारच्या वीस नोंदी उघड झाल्या आहेत. या पुरवठादारांनी अशा प्रकारच्या बनावट नोंदी केल्याचे मान्य केले आहे. रोख रकमेच्या बदल्यात धनादेश जारी केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर चुकवण्यासाठी खातेवहीत व्यावसायिक पावत्या कर्जाच्या रुपात दाखवण्यात आल्या होत्या. चौकशीत असे देखील आढळले की या बनावट कर्जांचा वापर गुंतवणुकीसाठी आणि मालमत्ता खरेदीसाठी केला जात होता. या माध्यमातून आतापर्यंत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कर चुकवण्यात आला आहे. २१ जुलै २०२० रोजी या अभिनेत्यांना स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेने 1-4-2021 पासून आतापर्यंत १८.९४ कोटी रुपयांच्या देणग्या जमा केल्या आहेत आणि त्यापैकी १.९ कोटी रुपये विविध प्रकारच्या मदतकार्यावर खर्च करण्यात आले आहेत तर उर्वरित १७ कोटी रुपये या संस्थेच्या बँकेच्या खात्यात आजपर्यंत वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. तपासात असे देखील आढळले आहे की परदेशी देणगीदारांकडूनही २.१ कोटी रुपयांच्या देणग्या या धर्मादाय संस्थेने स्वीकारल्या आहेत आणि हा एफसीआरए कायद्याचा भंग आहे.

लखनौच्या एका पायाभूत सुविधा समूहाच्या विविध संकुलांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले ज्या समूहामध्ये हा अभिनेता एका संयुक्त बांधकाम प्रकल्पामध्ये सहभागी झाला होता आणि त्याने यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधीची गुंतवणूक केली होती. यामधून करचुकवण्याशी संबंधित आणि खातेपुस्तकांमध्ये अनियमितता आढळली आहे. हा समूह उपकंत्राटी खर्चाच्या बनावट पावत्या बनवण्यामध्ये आणि निधी इतरत्र वळवण्यामध्ये गुंतला होता असे तपासात आढळले आहे. अशा प्रकारच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या बनावट कंत्राटांचे पुरावे सापडले आहेत. बेहिशोबी रोख रक्कम, बेहिशोबी भंगार विक्री आणि बेहिशोबी रोख रकमेच्या व्यवहारांचा डिजिटल डेटा यांचे पुरावे सापडले आहेत. त्याशिवाय हा पायाभूत सुविधा समूह/कंपनी जयपूरच्या एका कंपनीसोबत १७५ कोटी रुपयांच्या बनावट वर्तुळाकार व्यवहारातही सहभागी होता. चुकवलेल्या करांचे एकूण आकारमान निर्धारित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. छाप्यादरम्यान १.८ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि ११ लॉकर्स प्रतिबंधात्मक आदेशाखाली ठेवण्यात आले आहेत. ही शोधमोहीम अजूनही सुरू आहे आणि पुढील तपास प्रगतीपथावर आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का, बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये

Next Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
carona 11

नाशिक अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011