नवी दिल्ली – प्राप्तिकर अधिनियम, १९६१ (“कायदा”) अंतर्गत मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल दाखल करताना करदात्यांनी आणि इतर संबंधितांनी नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन ,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मुल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तिकर विवरणपत्रे आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही मुदत ३१ डिसेंबर आहे. अगोदर जुलै पर्यंत होती. पण, ती सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ती पुन्हा वाढवण्यात आली आहे. सीबीडीटी परिपत्रक क्र. 17/2021 F.No.225/49/2021/ITA-II दिनांक 09.09.2021 रोजी जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.