योगेश कातकाडे (कर सल्लागार)
विलंबित तसेच सुधारित आयटीआर आता १५ जानेवारी पर्यंत भरता येणार आहे. प्राप्तिकर विभागाने विलंबित/सुधारित रिटर्न (Belated or Revised ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आतापर्यंत विलंबित/सुधारित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. या संदर्भात आयकर विभागानेही X वर पोस्ट करून निवेदन जारी केले आहे.
आतापर्यंत विलंबित/सुधारित आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. परंतु या मुदत वाढीचा फायदा केवळ निवासी वैयक्तिक करदात्यांनाच होणार आहे.