नाशिक – नाशिक आयकर विभाग व नाशिक सायकल फाउंडेशन यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी सायक्लोथॉन २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आयकर अधिकारी कर्मचारी, सीए, कर सल्लागार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच नाशिक सायकल फाउंडेशनच्या सभासदांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. सदर स्पर्धा गोल क्लब येथून सुरू झाली. त्यानंतर ती सीबीएस,रविवार कारंजा, निमाणी, रामवाडी या मार्गावरुन गेली. १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करून आयकर कार्यालय नाशिक येथे या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त प्रवीण कुमार प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आयकर आयुक्त यशवंत चव्हाण, पुणे आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर नितीन महाजन, वस्तू , सेवा कर विभागाच्या संयुक्त आयुक्त श्रीमती अनुश्री हर्डीकर तसेच नाशिक सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किशोर काळे आणि प्रसिद्ध सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन हे उपस्थित होते.