नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विषारी साप म्हणून कोब्रा सापाला ओळखले जाते तो अन्य प्राण्यांची शिकार करत असतो मात्र कोब्रा सापानेच आपल्या जातीच्या सापाला गिळल्याची अनोखी घटना घडली. नांदगाव तालूक्यातील बाणगाव टाकळी येथील शेतकरी सागर पवार यांच्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना विहिरीत साप दिससला.
त्यानंतर त्यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन केला. बदोडे यांनी प्रयत्न करत सापाला बाहेर काढले असता तो कोब्रा जातीचा असल्याच लक्षात आले, त्यांनी सापाला पकडताच कोब्राने आपल्याच प्रजातीच्या कोब्राला सापाला पोटातून बाहेर काढले.
त्यामुळे चक्क कोब्रा सापाने भक्ष्यासाठी आपल्याच जातीच्या सापाला भक्ष्य केल्याची घटना दुर्मिळ असल्याचे सर्प मित्र विजय बदोडे यांनी सांगितले. कोब्राला पकडण्यात आल्यानंतर दुसरा कोब्रा मात्र मृत झाला होता. तर पकडलेल्या कोब्रा सापाला बडोदे यांनी बंदीस्त करत वनविभागाला माहिती देत त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडले..
In Nadangao taluka, a cobra snake swallowed a cobra snake