कुल्लू (हिमाचल प्रदेश) – देशभरात कोरोनाचा संसर्ग पाहता प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहेत. त्यातच या आजारापासून प्रतिबंध व्हावा म्हणून तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून वेगवेगळ्या आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच वेगवेगळ्या फळांचा देखील आहारात समावेश करण्यात येत आहे. म्हणूनच लाल रंगाच्या चेरी फळाला प्रचंड मागणी वाढली आहे.
कोरोना साथीच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना आता आपल्या दिनचर्येमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे. निरोगी राहण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यात हवामानात सतत बदल होत असल्यामुळे शारीरिक क्षमता बळकट करणे फार महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी पदार्थांची आवश्यकता असते. त्यासाठी कुल्लू जिल्ह्यातील चेरी या फळाची बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
लाल रंगाचे चेरी हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण चेरीमध्ये कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे अ, बी आणि सी, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीरास अनेक रोगांशी लढायला मदत करतात. त्यामुळे केवळ दिल्लीच नव्हे तर इतर राज्यांमधूनही चेरीची मागणी प्रचंड वाढली आहे.










