मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील कलाकार असो की त्यांचे नागरिक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमी चर्चा होत असते. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी घटस्फोट घेतले आहेत. आता आणखी एका जोडप्याच्या घटस्फोटाची सध्या चर्चा सुरू आहे. अभिनेता आमीर खानचा भाचा असलेला इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या वेग घेतला आहे.
बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर असलेला इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इम्रान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. इम्रान खानने पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता या दोघांमध्ये समन्वय नसल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, आपला मामा अमिरखानप्रमाणेच इम्रान खान केव्हाही पत्नीपासून वेगळे होण्याची घोषणा करू शकतात.
सन 2011 मध्ये इम्रान खानने त्याची खास मैत्रिण अवंतिका मलिकासोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे. लग्न आणि मुलानंतर त्यांचे आयुष्य सुंदरपणे पुढे जात होते की, 2019 पर्यंत दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. यानंतर इम्रान आणि अवंतिका दोघेही वेगळे राहू लागले. नवीन माहितीनुसार, इम्रान खान आणि अवंतिका मलिक आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत. सध्या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही.
हे नाते तुटण्यापासून वाचवण्यासाठी अवंतिकाने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. कोणत्याही कारणाने तिचे आणि इम्रान खानचे नाते कायमचे संपुष्टात यावे, असे तिला वाटत नाही. अवंतिकाचा समझोत्याचा प्रत्येक प्रयत्न फसला आहे. दोघांचे समान मित्र आणि कुटुंबीयांनीही दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कोणताही फायदा झाला नाही.