विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुठलाही कर्जदाता कर्ज देताना पूर्ण विचार करतो. कर्ज घेणाऱ्याची परतफेडीची क्षमता तपासली जाते. व्याज चुकविण्यास सक्षम आहे का हेदेखील बघितले जाते. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून शहानिशा केल्यानंतरच कर्जदाता कर्ज देतो. पण थोडी चूक झाली तरीही अर्ज फेटाळला जाऊ शकतो. बरेचदा क्रेडिट स्कोअर चांगला असतानाही कर्ज मिळत नाही. त्यामागे काही कारणं आहेत, आज ती जाणून घेऊया…
वय
कर्ज घेणाऱ्याचे वय अत्यंत महत्त्वाचे आहे. बरेचदा 60 पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे कर्ज मंजूर होत नाही. निवृत्तीच्या जवळ पोहोचलेल्या लोकांना 15 ते 25 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मंजूर होण्याची शक्यताच नसते. कारण निवृत्त झाल्यानंतर कर्जदार पैसे फेडण्यास सक्षम आहे की नाही, याबाबत कर्जदात्याच्या मनात शंका असते.
उत्पन्न
कर्ज घेणाऱ्याचे उत्पन्नही महत्त्वाचे आहे. कर्जदाराची परतफेडीची क्षमता तपासण्यासाठी त्याचे उत्पन्न जाणून घेतले जाते. त्यासाठी मासिक उत्पन्न, आश्रितांची संख्या आणि उत्पन्नाच्या स्रोताची स्थिरता तपासली जात असते. क्रेडिट स्कोअर चांगला आहे पण उत्पन्नच कमी आहे तर कर्जाचा अर्ज रद्दही होऊ शकतो.
इएमआय–इन्कम रेश्यो
कर्ज मंजूर करताना कर्जदाते अर्ज करणाऱ्याचा इएमआय–इन्कम रेश्योदेखील तपासला जातो. कर्ज घेणाऱ्याचे इएमआय त्याच्या मासिक उत्पन्नाच्या अर्धे असेल तरच त्याचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.