इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उन्हाळा सुरू झाला की शरीराची पाण्याची गरज वाढू लागते. आणि मग रसदार फळे किंवा पाणी असलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश केला जातो. उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी या दिवसात अधिकाधिक पाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यामध्ये अनेक आहारतज्ज्ञ काकडी खाण्याचा सल्ला आवर्जून देतात. काकडीमुळे शरीराला गारवा मिळतो.
काकडी सर्वांचीच आवडती असते. सहज म्हणूनही मीठ, तिखट लावून काकडी खाल्ली जाते. शरीरातील विषारी द्रव्य काढण्यासाठी पाण्यात काकडीचे काप तसेच लिंबू-पुदिना घालून प्यायले जाते. सॅलेडमध्येसुद्धा काकडीला सर्वाधिक पसंती मिळते. एवढ्या बहुगुणी काकडीची निवड करताना त्यात काळजी घेणे गरजेचे आहे. कारण काकडी कडू देखील असते. म्हणूनच अनेकदा काकडीची कोशिंबीर वगैरे करताना देठाची काकडी खाऊन पाहिली जाते. आपल्याला देखील असा अनुभव येऊ नये यासाठी काकडी विकत घेताना कशा विकत घ्यायच्या याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.
चांगली काकडी कशी ओळखायची?
१) काकडी खरेदी करताना, हिरव्या रंगाची आणि टणक काकडी निवडा. साधारण फिकट छटा असणाऱ्या किंवा पिवळसर काकड्या जुन्या आणि जास्त पिकलेल्या असतात. ज्या चवीला कडवट लागू शकतात.
२) तुम्ही खरेदीला जाता तेव्हा भाजी हातात घ्या व हलके दाबून पाहा. काकडी कुठेही मऊ झालेली जाणवली तर खरेदी करू नका. जर तुमच्या बोटाने दाबून काकडी तुटत असेल तर काकडी जून असते. जुनाट बिया या कडवट लागतात.
३) भाज्या जास्त काळ टिकण्यासाठी अनेकदा बरेच उत्पादक भाज्यांवर मेण लावतात. ते तपासण्यासाठी तुमच्या नखांचा वापर करून काकड्या किंचित खरडवून पहा.
४) आकाराने लहान आणि बारीक काकडी निवडा. लहान काकड्या ताज्या असतात.
५) काकडी सरळ आकाराची असेल असे बघा. वाकड्या काकड्या चवीला कडू शकतात.
Important Tips Cucumber Fresh and Tasty how to identify