पितृपक्ष (श्राद्धपक्ष)
- पंडित दिनेश पंत
दरवर्षी भाद्रपद पौर्णिमा या दिवशीपासून अर्थात गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष अर्थात पितृपंधरवडा यास सुरुवात होते. यंदा २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळामध्ये श्राद्ध पक्ष आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या काळामध्ये गरजवंतांना अन्नदान, पशुपक्ष्यांना दाणापाणी ठेवण्यास विशेष महत्त्व असते, असा शास्त्रार्थ आहे.
२० सप्टेंबर भाद्रपद पौर्णिमा तर ६ ऑक्टोबर म्हणजे भाद्रपद अमावस्या त्यामधील १४ दिवस अर्थात प्रतिपदा ते चतुर्दशी अशा सर्व तिथी या काळामध्ये येतात. आपल्या पितरांच्या मृत्यूची निश्चित तारीख अथवा तिथी माहिती नसल्यास भाद्रपद अमावस्या अर्थात ६ ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे. आपल्या पितरांच्या श्राद्ध तिथी दिवशी त्यांना आवडणारे अन्नपदार्थ गरजवंतांना दान करावे तर पशुपक्ष्यांना दाणापाणी ठेवावे असा प्रघात आहे.