मुंबई – दिवाळीनंतर राज्यभरात थंडीच्या लाटेने एण्ट्री केली आहे. त्यामुळेच अनेक शहरांमधील तपमानात लक्षणीय घट झाली आहे. काही ठिकाणी पारा थेट १० अंशांवर गेला आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार आहेत.
हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढच्या ४ दिवसात पावसाची शक्यता आहे. १२ ते १५ नोव्हेंबर या दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि संलग्न मराठवाडा भाग प्रभावित असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पाऊस बरसणार आहे. उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात मोठी घट झालीय. त्यातच आता पुन्हा हावामानात बदल होऊन पाऊस बरसणार आहे.
दरम्यान, हवामानातील या लक्षणीय बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी आणि काळजी घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
पावसाची माहिती देणारा नकाशा खालीलप्रमाणे