मुंबई – राज्याच्या जवळपास निम्म्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने पिवळा अलर्ट जारी केला आहे. आज व उद्या (१६ व १७ ऑक्टोबर) हा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, जालना, परभणी, नांदेड, लातूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी खालील नकाशा बघा