मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. पावसाने दडी मारल्याने राज्यात उष्णतेमुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस येईल, अशी भावना नागरिकांची झाली आहे. त्यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, येत्या ५ दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहेत. अधिक माहितीसाठी हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध अपडेटसकडे लक्ष ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात पाऊस संपूर्ण राज्य व्यापणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
17 Jun; येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता.
त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– IMD pic.twitter.com/yYycL1q5vw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2022