नवी दिल्ली – देशात सर्वत्र कोरोनाने कहर केला असताना अतिशय दिलासादायक वृत्त समोर आले आहे. यंदा पावसाळा चांगला होणार आहे. सरासरीच्या ९८ टक्के पाऊस यंदा बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने आज अधिकृतरित्या आगामी पावसाळ्याचा अंदाज जाहिर केला आहे. यंदा देशभरात पाऊस सरासरीच्या ९८ टक्के ते १०४ टक्के राहणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत हा पाऊस होणार आहे. मान्सूनला भारताचा अर्थमंत्री म्हटले जाते. कारण, पावसाळ्यावरच भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पावसाचा चांगला अंदाज जाहिर झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पाऊस चांगला राहणार असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रासाठीही गुडन्यूज
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस चांगला झाला होता. आताही तो चांगला होणार असल्याने महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/Indiametdept/status/1382944324871065602