पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे वादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातली पावसाचा जोर वाढेल,असा अंदाज हवामान विभाग वर्तविला आहे. तसेच विदर्भ, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे. आज शनिवारी ( दि. २०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
तसेच कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड व छत्तीसगडकडे मार्गस्थ होऊत,तेथे जोरदार पाऊस पडेल.पुढील आठवड्याच्या शेवटी मॉन्सूनचा आसही मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात उघडीप होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी परिसरात जोरदार पाऊस कायम राहील. तसेच मंगळवार ( दि.२३) पासून पावसाचा जोर कमी असेल. मात्र या काळातही तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता आहे.
आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर काही भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आता पुणे सातारा नाशिक येथील घाट परिसरात मेघ गर्जनेसह ढग तयार झाले आहेत. त्यामुळे तिथे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1560900088016564224?s=20&t=9E_Z0jnKtXOjAK2n2ufTKA
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, मंबई आणि परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही मुंबईसह परिसर आणि पुणे, सातारा, नाशिक तसेच कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दि. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळे नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
दि. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं सांगितले आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसत आहे. येत्या महिन्यावर आणखी काही ठिकाणी चांगला पाऊस पडणार असते सर्वसाधारण तुडुंब भरणार आहेत.
IMD Maharashtra Forecast Heavy Rainfall Weather
Climate Alert Districts Rain Vidarbha Ghat Section